‘ॲन्टेक्वेरियन बुकसेलर्स असोसिएशन ऑफ अमेरिका’चं ६३वं पुस्तक प्रदर्शन पाहताना ग्रंथवेडाला ‘जंटल मॅडनेस’ नव्हे, तर ‘रॉयल मॅडनेस’ म्हटलं पाहिजे, असं तीव्रतेनं वाटलं!

या प्रदर्शनात केवळ ‘पुस्तक प्रदर्शन’ म्हणून डोकावणे धाडसाचे ठरावे. काळाचे भान व विविध विषयांचे एकमेकाशी असलेले संबंध, याची जाणीव आपल्याला हवी. हे प्रदर्शन पाहताना आपल्याला माहीत असलेल्या महनीय व्यक्तिमत्त्वाच्या वेगळ्याच पैलूवर प्रकाश पडतो. या प्रदर्शनात शेक्सपिअर नाही, हे कसं शक्य आहे? लंडनच्या ‘पिटर हरिंगटन’ फर्मने १६२३ साली छापल्या गेलेल्या, पहिल्यावहिल्या संपूर्ण शेक्सपिअरची जाहिरात केली होती.......

पुस्तकाचे पान हे रस्त्यावरच्या एखाद्या नाक्यासारखे असते. तिथली सारी पात्रे वाचकाच्या आगमनाची वाट पाहत असतात. फक्त वाचकाला आईसारखे काळ-वेळ ओलांडत तिथे जाता आले पाहिजे...

एकदा पु. ग. सहस्त्रबुद्धे यांचे निबंध वाचताना तिने ते मध्येच मिटले आणि म्हणाली, “यात म्हटले आहे की, रामाच्या जागी कृष्ण असता तर त्याने दशरथाची वनवासात जाण्याची आज्ञा पाळण्याऐवजी त्याला अटक केली असती. मलाही नेहमी नेमके हेच वाटायचे.” रिव्हिलेशनची चमक क्षणभर तिच्या चेहऱ्यावर तरळून गेली. पु.गं.चे आणि तिचे खरे होते. स्वत:च्या बापाला अटकेत टाकायचा मक्ता फक्त मुघलांनी घ्यावा असे थोडेच आहे?.......